मंत्री गिरीश महाजन यांच्या मंजुरीने १० कोटींचा निधी मंजूर
मालवण :
राज्य सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कुडाळ आणि मालवण तालुक्यात प्रत्येकी पाच अशा एकूण १० निवारा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रांमुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
या निवारा केंद्रांमध्ये जनरेटेर रूम, सेप्टिक टँक, पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे यांसारख्या सुविधा असतील. कुडाळ तालुक्यात बाव, पावशी, माणगाव, चेंदवन, नेरूर तर मालवण तालुक्यात देवली काळेथर, मसुरे देऊळवाडा, भोगलेवाडी, चिंदर आणि मालडी या गावांमध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करून निवारा केंद्रांचे बांधकाम होणार आहे.
या बांधकामांसाठी एकूण १० कोटींच्या निधीला राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार निलेश राणे यांचे स्वीय सहाय्यक योगेश घाडी यांनी दिली.
