कु. हीना जसीम सारंग हिने पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक
सावंतवाडी
रविवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत आमच्या शाळेची विद्यार्थिनी कु. हीना जसीम सारंग हिने ४३ किलो सब-ज्युनियर वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिचे वजन ३४ किलो असून तिची राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल आम्ही कु. हीना जसीम सारंग हिचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. तिचे कष्ट, समर्पण, ताकद आणि खिलाडूवृत्ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. तिच्या या यशामुळे आम्हा सर्वांना अभिमान वाटतो.✨
— शाळा परिवार तर्फे हार्दिक अभिनंदन! 🏆
