दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID कार्ड काढून घेण्यासाठी तसेच लाभार्थी पडताळणीसाठी तालुकास्तरीय शिबीराचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी,
दिव्यांग कल्याण विभाग यांच्याकडील शासन परिपत्रकान्वये केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्वासंदर्भातील सर्व लाभ मिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (Unique Disability ID Card) हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची पडताळणी करुन त्यांची पात्र/अपात्र करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. जिल्ह्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांचे UDID (Unique Disability ID Card) काढून घेणे व इतर लाभार्थ्यांनी देखील सदर शिबिराच्या दिवशी उपस्थित राहून UDID (Unique Disability ID Card) कार्डची पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) आरती देसाई यांनी केले आहे.
विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांकडे UDID (Unique Disability ID Card) कार्ड नाही अशा शल्यचिकित्स, सिंधुदुर्ग यांच्याशी समन्वय साधून जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी संयुक्तरित्या तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय ओरोस येथील वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कॅम्पची तारीख व आयोजन करण्यात आलेले ठिकाण याप्रमाणे- दि. 28 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय देवगड. दि. 31 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय वैभववाडी. दि. 4 नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय कणकवली. दि. 7 नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला. दि. 11 नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय सावंतवाडी. दि. 14 नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग. दि. 18 नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय मालवण व दि. 21 नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय कुडळ येथे शिबीर सकाळी 11 ते 6 यावेळेत कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबीर आयोजनापूर्वी ज्या लाभार्थ्याकडे UDID कार्ड नाही अशा लाभार्थ्यांनी नोंदणी UDID पोर्टलवर करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर फॉर्म भरावा. फॉर्म लाभार्थ्यांनी जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन भरावा. फॉर्म भरण्यासाठी आधारकार्ड,रेशनकार्ड, फोटो, सही संकेतस्थळावर नोंदणी करुन त्याची पावती शिबीराच्या नमुद ठिकाणी वेळीच उपस्थित राहून UDID कार्ड काढून घ्यावे. तसेच उर्वरित लाभार्थ्यांनी UDID कार्डची पडताळणी करुन घ्यावी.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळसेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांतून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अर्थसहाय्य वितरीत करण्यात येते. या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान हे यापूर्वी प्रतिमहा 1 हजार 500 एवढे होते ते आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार प्रतिमहा 2 हजार 500 एवढा करण्यात आलेला आहे.
| अ.क्र. | तालुका | लाभ घेत असलेले लाभार्थी | UDID (Unique Disability ID Card) कार्ड असलेले लाभार्थी | UDID (Unique Disability ID Card) कार्ड नसलेले लाभार्थी |
| 1 | देवगड | 965 | 221 | 744 |
| 2 | कणकवली | 1083 | 717 | 366 |
| 3 | मालवण | 746 | 484 | 262 |
| 4 | सावंतवाडी | 670 | 460 | 210 |
| 5 | वेंगुर्ला | 557 | 28 | 529 |
| 6 | वैभववाडी | 315 | 295 | 2 |
