You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात यूडीआयडी कार्डसाठी विशेष शिबिरे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यूडीआयडी कार्डसाठी विशेष शिबिरे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यूडीआयडी कार्डसाठी विशेष शिबिरे; लाभार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषद, सिंधुदुर्गच्या समाज कल्याण विभागामार्फत युनिक डिसएबिलिटी आयडी (यूडीआयडी) कार्ड मिळविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांकडे अद्याप यूडीआयडी कार्ड नाही, त्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

ही शिबिरे पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात आली आहेत —

२८ ऑक्टोबर: ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी

४ नोव्हेंबर: ग्रामीण रुग्णालय, कणकवली

७ नोव्हेंबर: ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ला

११ नोव्हेंबर: ग्रामीण रुग्णालय, सावंतवाडी

१४ नोव्हेंबर: ग्रामीण रुग्णालय, दोडामार्ग

१८ नोव्हेंबर: ग्रामीण रुग्णालय, मालवण

प्रत्येक शिबिराचे वेळापत्रक सकाळी ११ ते संध्याकाळी ६ असेल.

यूडीआयडी कार्ड नसलेल्या लाभार्थ्यांनी www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म भरावा. त्यानंतर फॉर्मची प्रिंट, आधार कार्ड, शिधापत्रिका, फोटो, सक्षम प्राधिकाऱ्याचे जुने अपंगत्व प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्रांसह शिबिरस्थळी उपस्थित राहावे. शिबिरामध्ये वैद्यकीय तपासणीनंतर यूडीआयडी कार्ड व प्रमाणपत्रे वितरित केली जातील.

प्रतिक्रिया व्यक्त करा