पिंगुळी-मोडकावड येथे कार पलटी; महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात
कुडाळ
मुंबई–गोवा महामार्गावर पिंगुळी-मोडकावड येथे आज सकाळी झालेल्या अपघातात एक व्हॅगनआर कार पलटी झाली. सकाळी अंदाजे ८.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. महामार्गावरील खड्ड्यांमुळे कारचा तोल जाऊन ती पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वारंवार होणाऱ्या खड्ड्यांमुळे या मार्गावरील वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने महामार्गावरील खड्डे दुरुस्त करावेत, अशी मागणी केली आहे.

