यमुनानगर निगडी –
पिंपरी चिंचवड महापालिका माजी सभागृह नेते आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य माजी प्रवक्ते श्री एकनाथ दादा पवार संस्थापक असलेल्या प्रभु श्रीराम मंदिर चारिटेबल ट्रस्ट च्या पदाधिकारी आणि सदस्य यांनी यमुनानगर निगडी होणाऱ्या प्रभु श्रीराम मंदिर मध्ये प्रभू श्रीरामची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होणाऱ्या २२ जानेवारी २०२४ च्या दिवशी करण्याचा संकल्प केला.
हनुमान जयंती ६ एप्रिल २०२३ ला भूमिपूजन करण्यात आले आणि अवघ्या ८ ते ९ महिन्यात प्रभु श्रीरामचे मंदिर उभारून ठरलेल्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून नित्य नियमाने मंदिरामध्ये धार्मिक विधी पूजा, रोजची सकाळ आणि संध्याकाळ आरती आणि रामरक्षा पठण, हनुमान चालीसा पठण केले जाते.
२२ जून २०२४ पासून सकल हिंदू समाजातील लोकांनी एकत्र येऊन महाआरती दरमहिन्याच्या २२ तारखेला करावी ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
या महिन्याची २२ तारखेची महाआरती दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे पुणे जिल्हा महामंत्री श्री धनंजय जी गावडे यांच्या उपस्थितीत आणि यमुनानगर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री गजाननजी ढमाले यांच्या हस्ते झाली.
महाआरती नंतर प्रमुख वक्ते श्री धनंजयजी गावडे आणि श्री ढमाले काका आणि सौ. ढमाले काकू यांचा मंदिराचे सरचिटणीस श्री शिरीषजी जेधे, सदस्य श्री सुदानजी परब, श्री चंद्रकांतजी शेडगे आणि सह कोषध्यक्ष मनोहर चौगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मंदिराचे कार्याध्यक्ष श्री बाबा परब महाआरतीस उपस्थित होते.ट्रस्ट चे चिटणीस श्री रविंद्रजी कुकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, वक्त्याचा परिचय आणि आभार प्रदर्शन केले.प्रमुख वक्ते श्री धनंजय जी गावडे यांनी उपस्थित सर्व रामभक्त नागरिक बंधू,माता भगिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थिताना संबोधन करताना सांगितले की ,”अयोध्येतील राम मंदिर निर्माण करून आपण हिंदू अस्मितेचा एक टप्पा गाठलेला आहे, आता आपल्या हिंदू समाजाला मथुरा आणि काशी विश्वेश्वर साठी धार्मिक लढाई लढायची आहे”.
त्यांनी प्रभू श्रीराम लंका विजय आणि वनवास संपवून जेव्हा अयोध्ये मध्ये आगमन केले त्यावेळच्या एका प्रसंगाची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक, तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी श्री अप्पासाहेब कुलकर्णी,आधार जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष श्री नारायण पाटील आणि अन्य जेष्ठ नागरिक, समरसता साहित्य परिषदेच्या कार्यकारणी सदस्या सौ. स्वातीताई भोसले,भाविक भक्त नागरिक बंधू, माता भगिनी उपास्थित होते. महाआरती आधी ट्रस्ट चे पदाधिकारी आणि सदस्य तसेच मंदिराच्या महिला कार्यकर्त्या सौ. नीता आंबेरकर, सौ. प्रतिभा कुलकर्णी यांनी दीपोत्सव साजरा केला.
