You are currently viewing ती येते आणिक जाते

ती येते आणिक जाते

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ती येते आणिक जाते*

 

ती येते आणिक जाते,

वर्षानुवर्षे ती येतच राहते

येताना हसतच येते

तिच्या स्मिता ने घर उजळून निघते,

आनंदाचे उधाण घेऊन येते

येतांना तेजाच्या कळ्या आणते

लाजत लाजत कळ्या फुलवते, मंद प्रकाशातही तेज ओसंडते

काहीतरी तिला सांगायचे असते

मिणमिणत्या उजेडात गुणगुण ते, ती येते आणिक जाते.

येताना तिमिराला दूर सारते

आयुष्याला नव्याने उजाळा आणते .

येताना मैत्रिणींचा थवा घेऊनच

येते, आणिक सर्वांना ओळीत बसवते. काही जणी देव्हार्यात गाभार्यात, कोनाड्यात, तुळशीपाशी मंद तेवती ज्योती उजळती भाग्य कवाडे नशिबाची.

गारव्याच्या शिरशिरित, गुलाबी

थंडीत, गोवत्स कामधेनु चा वसुबारस दुग्धपाने तृप्त करी.

धनत्रयोदशी ची धनाची पूजा होई तिच्या प्रकाशात, नरकासुराच्या वधाच्या साक्षीस

फडफडती ज्योत, अमावस्या, लक्ष्मी कुबेरपूजनास तेजाळती ज्योत प्रकाशित. दिवाळीचा पतीपत्नीचा पाडवा, प्रेममय

नजराणे, सौभाग्याचे लेणे, ज्योत पाही खुशीने, बली प्रतिपदेनंतर, सर्वबंधुभगिनींच्या

मायाममतेची भेट, खुशीत ओवाळणी, बहिणीचा आधार बंधुराजा माहेरची ओढ.

सारे पाही ती दिवाळी.

सुगंधित अभ्यंगाने नवचैतन्याच्या उर्मि,नाविन्याची होई खरेदी, दिव्यांची रोषणाई.

झगमगाट, चकचकीत, स्वादिष्ट फराळाचा थाट. रांगोळ्यांचे गालिचे, तोरणे, आकाश दिव्यांच्या झुलत्या रांगोळ्या सारे कसे हवेसे, ही रोषणाई घेऊन ती येते . आतषबाजी चे मयुरपिसारे फुलविते, आनंदाच्या हिंदोळ्यावर सर्वां फिरविते वैभवाच्या झुल्यावर झुलवून आणते, सुखसमृद्धिच्या लाटांवर फेसाळणा, अशी ती येते आणिक जाते. सारे दुःख विसरवुनि संख्येत नांदविते.

अशी ती,

अशी ती ,

अशी ती,

 

येते आणिक जाते.

सर्वान्मनी इंद्रधनूचे रंग खुलविते

अशी ती…….. .. अशी ती

येते आणिक जाते.

.

 

स्वरचित

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर.

विरार

प्रतिक्रिया व्यक्त करा