You are currently viewing ज्येष्ठ कलाकार विलास गवस यांचा डोंबिवली नाट्य महोत्सवात सत्कार 

ज्येष्ठ कलाकार विलास गवस यांचा डोंबिवली नाट्य महोत्सवात सत्कार

ज्येष्ठ कलाकार विलास गवस यांचा डोंबिवली नाट्य महोत्सवात सत्कार

डोंबिवली

दशावतार क्षेत्रातील ज्येष्ठ, अनुभवी आणि मनमिळावू कलाकार सन्माननीय श्री. विलास गवस यांचा नुकताच डोंबिवली येथे आयोजित नाट्य महोत्सव दरम्यान सत्कार करण्यात आला.

दशावतार कलेतील त्यांचा दीर्घ अनुभव, निखळ अभिनयशैली आणि “मीपणा” नसलेले साधं, नम्र व्यक्तिमत्व यामुळे ते कलाकार आणि रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत. त्यांच्या कलाप्रवासाचा गौरव करत महोत्सव समितीने त्यांना मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि अभिनंदनपत्र देऊन सन्मानित केले.

या प्रसंगी उपस्थित प्रेक्षकांनी आणि सहकलाकारांनी त्यांना उत्स्फूर्त दाद देत उभं राहून स्वागत केलं.
विलास गवस यांच्या या सन्मानामुळे दशावतार कलेतील नव्या पिढीला प्रेरणा मिळाल्याचंही मत व्यक्त करण्यात आलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा