You are currently viewing तेरेखोल नदी पार करून ‘ओंकार’ वाफोलीत

तेरेखोल नदी पार करून ‘ओंकार’ वाफोलीत

तेरेखोल नदी पार करून ‘ओंकार’ वाफोलीत

बांदा

शनिवारी सायंकाळी इन्सुलीत दाखल झालेला ‘ओंकार’ हत्ती आज सकाळी तेरेखोल नदी ओलांडून वाफोलीत दाखल झाला. येथील लिंगेश्वर मंदिर धुरीवाडी येथील नदीपात्रात वनविभागच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफिने त्याला पाण्यात उतरवले. वनपाल पुथ्वीराज प्रताप, वनरक्षक रिद्धेश तेली व निलेश मोर्ये यांनी नदीत उडी टाकून त्याला नदी ओलांडून जाण्यासाठी मार्ग दाखवीला. वनविभाग व पोलिसांच्या टीमने त्याला नदीपार करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले.

ओंकार हत्तीचे सध्या पोटापाण्याचे हाल होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याला पुरेसे अन्न मिळत नसल्याने वनविभागाने त्याच्या अन्नाची व्यवस्था प्राधान्याने करणे गरजेचे आहे. ऊस किंवा भेडल्या माडाची पाने विपुल प्रमाणात देऊन त्याचे पोट भरेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा