३ नोव्हेंबरला धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; “गरुडझेप” नाट्यप्रयोग ठरणार विशेष आकर्षण
दोडामार्ग :
कुडाळ-पिंगुळी येथील प. पू. राऊळ महाराज यांच्या कीर्तीचा गौरव आजही अविचल आहे. त्यांच्या इच्छेनुसार प. पू. विनायक (अण्णा) महाराज यांनी साटेली भेडशी येथे उभारलेले “प. पू. स. समर्थ राऊळ महाराज स्मारक मंदिर” यंदा नवव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी घेऊन भक्तांसाठी खुलं होणार आहे.
या उत्सवाचा मुख्य सोहळा सोमवार, दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा करण्यात येणार असून राऊळ महाराज संस्थान पिंगुळीचे कार्याध्यक्ष विठोबा राऊळ यांनी सर्व भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
पहाटे ५.३० ते ६ वा. – काकड आरती
सकाळी ७ ते ९ वा. – श्री प. पू. राऊळ महाराज चरणी अभिषेक, पाद्यपूजा व सार्वजनिक गाऱ्हाणे
सकाळी ९ ते १२ वा. – महिला भजन सत्र
भवानी सातेरी धारेश्वर महिला भजन मंडळ (घोटगे)
सातेरी महिला भजन मंडळ (खानयाळे)
सातेरी केळबाई महिला भजन मंडळ (दोडामार्ग)
दुपारी १२.३० ते १ वा. – श्रीची महाआरती
दुपारी १ ते ३ वा. – महाप्रसाद
दुपारी २.३० ते ४ वा. – श्री हनुमान दामोदर प्रासादिक भजन मंडळ यांचे भजन
सायं. ४ ते ६ वा. – घारपी ग्रुपची बाल फुगडी व भाऊ नाईक यांचे किर्तन
सायं. ६ ते ७ वा. – समई नृत्य (श्री सातेरी लोककला मंच महिला ग्रुप, तळेखोल)
सायं. ७ ते ८ वा. – सांजआरती
रात्रौ ८ ते १० वा. – राऊळ महाराज यांची पालखी मिरवणूक, दिंडी सोहळा व ढोल-ताशांचा जल्लोष
विशेष आकर्षण : रात्रौ १० वा. “गरुडझेप (आग्र्याहून सुटका)” या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे सादरीकरण माजी विद्यार्थी संघ, कुडासे यांच्या वतीने करण्यात येणार असून श्री. राजन दत्ताराम म्हापसेकर आणि श्री. अशोक विश्वनाथ कदम यांचे सौजन्य लाभले आहे.
या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून दर्शन, महाप्रसाद व सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राऊळ महाराज संस्थान पिंगुळीचे कार्याध्यक्ष विठोबा विनायक राऊळ यांनी केले आहे.
