मालवण :
जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या मालवण तालुक्यातील डांगरमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ पासून सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे.
या सप्ताहाची सांगता दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. तरी सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा तसेच हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव रवळनाथ मंदिर, डांगरमोडे येथील विश्वस्त मंडळाने केले आहे.
