पालकमंत्री यांच्या उपस्थितीत शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर यांच्यासह पदाधिकारी यांचा भाजप मध्ये प्रवेश
वेंगुर्ले
सावंतवाडीतील (शिंदे) शिवसेनेचे युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी यांनी आज शनिवारी वेंगुर्ले येथे भाजपा नेते तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
प्रतिक बांदेकर यांच्या सोबत धनशाम जाबरे, आशिष कुलकर्णी, भावेश कुडतरकर, आदित्य सगम यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, शक्ती केंद्र प्रमुख अमित गवंडळकर, मंथन जाधव आदी उपस्थित होते.

