दिविजा वृद्धाश्रम असलदे यांना अन्नदान
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, आणि एकात्मता वारकरी संप्रदाय, कोकण दिंडी यांचा उपक्रम
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग आणि एकात्मता वारकरी संप्रदाय, कोकण दिंडी कार्तिकी पायी वारी यांच्या संयुक्त विद्यमाने दिविजा वृद्धाश्रमात असलदे यांना पन्नासकीलो तांदूळ दिला.
यावेळी संप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी वृद्धांची सेवा व्हावी या हेतुन दान केले आहे.अन्नदानाच्या या उपक्रमाद्वारे वृद्धांना पोषण देण्याबरोबरच सामाजिक एकात्मतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही केला आहे. उपस्थितांनी या कार्याचे कौतुक केले आणि अशा उपक्रमांनी समाजात सद्भावना निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमातून केवळ अन्नदान नाही, तर वारकरी संप्रदायाच्या धर्मादिक आणि सामाजिक कार्याचा आदर्शही पाहायला मिळाला. वृद्धाश्रमातील कर्मचारी आणि वृद्ध नागरिकांनी या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.या वेळी वारकरी संप्रदाय आणि कोकण दिंडीचे वारकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
