यमुनानगर निगडी-
हिंजवडी आय टी पार्क पासून ३० किमी अंतरावर असलेल्या टेमघर धरणाजवळ लव्हार्डे, आंदगाव, वातुंडे, भोडे, वांजळे हा भाग दुर्गम असून नागरिकांना अद्यापही दिवाळीचा आनंद घेता येत नाही.
त्यामुळे तिथे जाऊन तिथल्या लोकांसोबत संवाद साधून, त्यांच्यात मिसळून, यमुनानगर सहयोग फाऊंडेशनच्या वतीने तिथे जाऊन तिथल्या लोकांना फराळ, महिलांना साड्या, आकाशकंदील यांचे वाटप करण्यात आले.
दिवाळीत आपण एकटेच फराळाचा आस्वाद का घ्यावा, सर्वाना वाटून खाण्यात एक वेगळाच आनंद आहे, तो योग दिवाळीच्या पूर्वसंध्येला साधण्यात आला.
गेली अठरा वर्षे यमुनानगर मधील सहयोग फाउंडेशन हा उपक्रम राबवत आहे. समाजात समरसता आणण्याच्या प्रयत्नाने हा उपक्रम राबवला जातो. प्रत्येक वर्षी एका वेगळ्या दुर्गम ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांसोबत संवाद साधून, त्यांच्यात मिसळून, त्यांना फराळ वाटप केला जातो.
सहयोग फाउंडेशन यमुनानगर, निगडी तर्फे ह्या उपक्रमासाठी यमुनानगर मधील नागरिकांकडून भरघोस निधी दिला जातो. यावेळी यमुनानगर मधील नागरीक स्वतः जाऊन त्या भागास भेट देतात व उपक्रम राबवतात.
या उपक्रमात नंदकुमार (अप्पा) कुलकर्णी, धनाजी शिंदे, अनिल अढी,यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री गजानन ढमाले, अजय म्हाळस, दिनेश कुलकर्णी सर, अशोक वाळके पाटील, विकास देशपांडे, आदित्य कुलकर्णी, जगदीश साबळे, गिरीष देशमुख, सोमनाथ काळभोर, चि आर्यन व प्रशांत बाराथे, श्री शनैश्वर प्रतिष्ठानचे श्री गोपाळ शेठ मुरकुटे, केशव पवळे, गिरीश भोकरे सहभागी होते.

