देवगड येथे उद्या रक्तदान शिबीर.
देवगड
फ्रेंडस् सर्कल- देवगड सडा, गुजराती नवरात्र मंडळ-देवगड व सिंधु रक्तमित्र देवगड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. येथील राधाकृष्ण रिट्रेट (तारामुंबरी रोड) येथे रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राजेश तारी (९४२०२६००८०)यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे. तसेच नेत्र तपासणी शिबिराचाही अधिकाधिक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन फ्रेंडस् सर्कलच्यावतीने करण्यात आले आहे.
