You are currently viewing देवगडमध्ये दिव्यांगांसाठी UDID नोंदणी व पडताळणी शिबिराचे आयोजन

देवगडमध्ये दिव्यांगांसाठी UDID नोंदणी व पडताळणी शिबिराचे आयोजन

सामाजिक न्याय विभागाच्या सूचनेनुसार २८ ऑक्टोबर रोजी देवगड ग्रामीण रुग्णालयात शिबिर

लाभार्थ्यांनी UDID कार्ड अनिवार्यपणे काढावे – तहसिलदार रमेश पवार

देवगड:

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांजकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळसेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांतून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अर्थसहाय्य वितरीत करण्यात येते. सदर योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान हे यापूर्वी प्रतिमहा १५००/ एवढे होते ते आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांजकडील शासन निर्णय क्रमांक विसयो-२०२५/प्र.क्र.६९/विसयो दि. १५ सप्टेंबर, २०२५ अन्वये २५००/- प्रतिमहा एवढे करणेत आलेले आहे.

देवगड तालुक्‍यात एकूण ९५८ दिव्यांग लाभार्थी हे या योजनेचा लाभ घेत आहेत. या पैकी UDID (Unique Disability ID Card) ५७९ कार्ड असलेले लाभार्थी असून UDID (Unique Disability ID Card) ३७९ कार्ड नसलेले लाभार्थी एवढे आहेत. दिव्यांग कल्याण विभाग यांजकडील शासन परिपत्रक क्रमांक दिव्यांग-२०२४/प्र.क्र.८६/दि.क.२ दिनांक २७ जून, २०२४ अन्वये केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्वासंदर्भातील सर्व लाभ मिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (Unique Disability Identity Card-UDID Card) हे बंधनकारक करणेत आलेले आहे.

तसेच सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची पडताळणी करुन त्यांची पात्र/अपात्रता तपासणी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हयातील र्व दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांचे UDID (Unique Disability ID Card) काढुन घेणे व इतर लाभार्थी यांनी देखील सदर शिबीरोच दिवशी उपस्थित राहून आपलेकडील UDID (Unique Disability ID Card) ची पडताळणी करुन घेणे आवश्यक आहे.

या करीता शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांचेशी समन्वय साधून जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांनी संयुक्तरित्या तालुका स्तरावर मंगळवार दिनांक २८/१०/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते १.०० यावेळेत जिल्हा रुग्णालय ओरोस येथील वैदयकीय पथकाच्‍या उपिस्थित देवगड ग्रामीण रूग्‍णालयात दिव्यांग UDID नोंदणी शिबिराचे आयोजन करण्‍यात आले.

तरी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांजकडून लाभ सुरू असलेल्‍या लाभार्थ्‍यांनी या शिबिरात सहभागी होवून दिव्यांग UDID नोंदणी तसेच पडताळणी करून घेण्‍याचे आवाहन तहसिलदार रमेश पवार यांनी प्रसिध्‍दी पत्रकातून केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा