You are currently viewing २०२५-२६वार्षिक मूल्यदरवाढ संदर्भात क्रेडाई सावंतवाडी सदस्यांची मा.सहाय्यक संचालक,कोकण विभाग ठाणे यांची भेट

२०२५-२६वार्षिक मूल्यदरवाढ संदर्भात क्रेडाई सावंतवाडी सदस्यांची मा.सहाय्यक संचालक,कोकण विभाग ठाणे यांची भेट

*२०२५-२६वार्षिक मूल्यदरवाढ संदर्भात क्रेडाई सावंतवाडी सदस्यांची मा.सहाय्यक संचालक,कोकण विभाग ठाणे यांची भेट

सावंतवाडी

मा. सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व मा. सहाय्यक संचालक, नगररचना, मुल्यांकन, कोकण विभाग ठाणे यांचे अध्यक्षतेखाली सन 2026 – 27 या वार्षिक मुल्यदर तक्त्यामध्ये काही सुचना किंवा अभिप्राय, त्रुटी सादर करण्यासाठी जुना डी. पी. डी. हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे क्रेडाई सावंतवाड़ी याना आमंत्रित करण्यात आले होते.
सध्या सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण व नगरपरिषद हद्दीसाठी सन 2026 -27 सालाकरिता मुल्यदरतक्ते तयार करण्याचे काम सुरू आहे.
यावेळी क्रेडाई सावंतवाडी तर्फे सन २०२५-२६ साली वाढविण्यात आलेले रेडी रेकनर दर हे बाजारभावापेक्षाही जास्त निश्चित झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर ते दर वास्तवाशी सुसंगत राहतील यासाठी कमी करण्याचे यावेत या प्रयत्नात आपल्या कार्यालयाकडूनही आवश्यक ती मदत आणि सहकार्य लाभावे अशी विनंती करण्यात आली.तसेच तसेच, सध्याच्या वाढीव दरांमुळे पुढील गंभीर अडचणी निर्माण झालेल्या आहेत : -१. दरवर्षी वाढणारे रेडी रेकनर दर हे वास्तविक बाजारभावाशी विसंगत असून व्यवहारावर विपरीत परिणाम होतो.
२. वाढीव दरांमुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक ताण येतो.
३. उद्योगात मंदीचे वातावरण असून बांधकाम व्यवसायाला फटका बसत आहे.
सदर अडचणींचा तपशीलवार उल्लेख सोबत जोडलेल्या निवेदनात देण्यात आला.तसेच विकसन करारनाम्याच्या अनुषंगाने विकसक स्वतःसाठी राखून ठेवत असलेल्या सदनिका/दुकाने /कार्यालये इ. ते स्वतःसाठी खरेदी करीत असलेल्या दस्त प्रकरणी मूल्यांकन प्रकरणी स्वतःचे मिळकतीचे नोंद णी करण्यास पुनः मुद्रांक शुल्क भरणे अन्यायकारक आहे त्यासाठी नाममात्र (रु. 500/-) मुद्रांक ठेवावे.
२.पार्किंग सुविधा असलेल्या बहुमजली निवासी इमारतीच्या दरामध्ये 5 व्या मजल्यावरील सदनिकाचे मुल्यांकनामध्ये 5% वाढ केलेली आहे. ही वाढ चुकीची आहे.
३.नविन बांधकाम नियमावलीनुसार जादात्तर मिळकतीवर बांधकाम क्षमतेमध्ये वाढ झालेली आहे. सदर बांधकामाचा करारनामा करताना शासनाच्या चालू मूल्यांकन तकत्यातील बांधकाम दरानेच आकारणी केली जाते त्यामुळे सदर बांधकामास ज्यादाचा रेट लावणे चुकीचे आहे. लहान शहरात सहाव्या सातव्या मजल्यावरील फ्लॅट विकणे जिकरीचे आहे. शिवाय तिथे कोणताही वाढीव दर विकसकास मिळत नाही. तरी सदर मूल्यांकन वाढ ही रद्द करण्यात यावी.
४.वाहनतळाचे मुल्याांकन करताना जर हे वाहनतळ दुकाने / कार्यालय याांचेसाठी विक्री केले असलेस संबंधित दुकाने / कार्यालय यांच्या दराच्या २५% मुळ दराने मुल्याांकन केले जाते हे पूर्णपणे चूकीचे आहे, तरी वाहनतळाचे मुल्याांकनासाठी फक्त निवासी इमारतीच्या दराच्या २५% मुळ दराने मुल्याांकन करावे. इत्यादि मागण्या करण्यात आल्या

यावेळी मा. सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग मा.प्राची घोलप मॅडम व मा. सहाय्यक संचालक, नगररचना, मुल्यांकन, कोकण विभाग ठाणे मा.उईके साहेब यांच्या बरोबर क्रेडाई सावंतवाडीचे अध्यक्ष नीरज देसाई,खजिनदार यशवंत नाईक,सदस्य सतीश बागवे,प्रवीण परब,उदय पारळे ,संजय सावंत आणि मंदार कल्याणकर आदि सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा