You are currently viewing राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत नील बांदेकरचे सुयश

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत नील बांदेकरचे सुयश

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत नील बांदेकरचे सुयश

सावंतवाडी

शिवाजी खैरे प्रतिष्ठान आयोजित रजिस्टेड संस्था मुंबई,यांनी घेतलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सांगेली नवोदय विद्यालयाचा सातवीत शिकणारा विद्यार्थी कु.नील बांदेकरने राज्यात तिसरा आणि सिंधुदुर्गात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. या स्पर्धेत नीलच्या गटातून राज्यभरातून सहाशेहूनही जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेच्या यशासाठी त्याला त्याचे मामा डॉ. उमेश सावंत यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.
नीलने आतापर्यंत पाचशेहूनही अधिक स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत.
त्याच्या या यशात त्याचे आई-वडील गौरी बांदेकर आणि नितीन बांदेकर यांचा मोलाचा वाटा आहे.
सर्व स्तरातून नील वर कौतुकाचा वर्षाव होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा