*🌞🪔 जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना 🪔🌞*
*”भाऊबीज”*
जपावे प्रेम बंध निरामय भावनेनं
बंधुभावाची शिकवण भाऊबीज सण IIधृII
सूर्यनारायण छायाचे यम यमुना संतान
यमुनानं बंधू यमास केले बोलावणं
यमाने घेतले ओवाळून दिले वस्त्राभूषणII1II
कार्तिक मासी शुद्ध पक्षातील द्वितीया दिन
तेजस वर्धमानता दावी द्वितीयेचा चंद्र
वैर संपून भावबंधन होते वृद्धिंगतII2II
शालू चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटास
वस्त्राहरणाचे वेळी येतो धावून श्रीकृष्ण
वसु चांदण्याच्या ज्योतीने करी चंद्रऔक्षणII3II
भाऊ जातो भगिनीकडे भाऊबीज निमित्त
बहिण गोड खाऊ देत करिते औक्षण
बंधू घाली ओवाळणी करी अभिष्टचिंतनII4II
बंधू भगिनींच्या प्रेमाचे संवर्धन दिन
समाज धर्मातील पवित्र धार्मिक सण
जपती आपापसातील नैतिक स्नेहबंधनII5II
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
