You are currently viewing अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये संगीता बढे यांच्या कवितेला पुरस्कार प्राप्त

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये संगीता बढे यांच्या कवितेला पुरस्कार प्राप्त

हिंगणघाट :

नुकतेच हिंगणघाट येथे मराठी साहित्य मंडळाच्या वतीने पंधरावे साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पडले. याच संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित चाळीसाव्या कवी संमेलन मध्ये कवयित्री रणरागिणी संगीता बढे यांच्या कवितेला द्वितीय क्रमांक मिळाला.

त्यांच्या कवितेचे शीर्षक होते, *आठवण बाबांची* त्यांनी या कविते मध्ये वडील नसलेल्या लहान मुलाच्या मनस्थिती चे भावनिक अलवार वर्णन केले आहे. इतर मुलांना त्यांच्या वडिलांसोबत बघितल्यावर त्या मुलाच्या मनात काय काय विचार येतात याचे जिवंत चित्रण बढे यांच्या या कवितेत बघायला मिळते.

या कवी संमेलनात महाराष्ट्रातील एकूण चाळीस कवींनी आपल्या कविता सादर केल्या. त्यात संगीता बढे यांच्या कवितेला द्वितीय क्रमांक मिळाला.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी वर्धा येथील डॉ.किरण नागतोडे या होत्या. उद्घाटक म्हणून श्री तुकाराम सातपुते होते तर माजी अध्यक्ष डॉ.पुष्पा तायडे होत्या.

तालुकाध्यक्ष डॉ.बालाजी राजुरकर, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.जयप्रकाश घुमटकर मुंबई, ऍड.नीता कचवे अमरावती यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा