*🪔 जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना 🪔*
*लक्ष्मी पूजन*
भाग्यदाती लक्ष्मी आम्हा आशीर्वाद दे
तव कृपा सर्वां वरी सर्वदा राहू दे।।धृ।।
तव स्वागतार्थ आम्ही पाऊले काढितो
साजशृंगार ल्यालेली तुझे औक्षण करितो
त्रैलोकी तव सन्मान दैन्य दूर होऊ दे।।1।।
सर्वांच्या घरात नित्य सुमंगल होऊ दे
कोटी सूर्य तेज किरणे सर्वांवर बरसुदे
सर्वांच्या मनोकामना सुफळ होऊ दे।।2।।
कंकु भाळलेली कंकणे भुषवणारी
आरक्त कमलासम नेत्र असणारी
व्यंकटेशा प्रिय पत्नी आम्हा सौख्य दे।।3।।
गज चित्काराने प्रफुल्लित होणारी
संतृप्त संपदा सर्वां तृप्ती देणारी
कमलांकित करकमला समृद्धी दे।।4।।
आनंद कर्दम श्रीद चिकलीत तव सूत
कुबेर तव स्वामी विश्व रक्षक होत
समृद्धी दाती तव वास सदैव राहू दे।।5।I
धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्य शौर्य लक्ष्मी
विद्या लक्ष्मी किर्ती लक्ष्मी विजय लक्ष्मी
राज लक्ष्मी अष्ट रूपधारी आह्मा सौख्य दे।।6।।
काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत जि.रायगड.
पिन.410201.Cell.9373811677.
