बांदा
काजुचा याेग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी, व्यापारी, कारखानदार यांची संयुक्त बैठक तहसिलदार यांच्या माध्यमातुन घेण्याचा निर्णय सावंतवाडी-दोडामार्ग तालुका शेतकरी व फळबागायतदार संघटनेच्या बुधवारी डेगवे माऊली मंदिरात झालेल्या बैठकित घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. योग्य भाव न मिळाल्यास शेतकरी चांगला दर देणारा खरेदीदार शोधुन त्याला काजु विक्री करतील. त्यासाठी संघ गावागावात काजु खरेदी करुन चांगला भाव देणारया खरेदीदाराला घालतिल. अशावेळी कुणीही व्यापारयाने खरेदीला आडकाठी करु नये यासाठी प्रथम व्यापारी आणि कारखानदार यांच्याशी चचाॅ करण्याचे ठरले. यापुवीॅ कुषी उत्पन्न बाजार समितीने काजु खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी विरोध झाला होता. असा प्रसंग पुन्हा उदभवु नये यासाठी बैठक घेण्याचे ठरले.
बैठकीत काजुला खचाॅच्या तुलनेत दर मिळत नाही. काजु पिक घेणारा शेतकरी जॅसे थे आहे. त्याच्या परीस्थितीत सुधारणा होत नाही. तो गरीबच राहीला. मात्र काजु खरेदी करणारा व्यापारी , कारखानदार अधिकाधिक श्रीमंत होत गेला असा सभेत सुर उमटला
तर शेतकरी संघटीत नसल्याने त्याना योग्य भाव मिळत नाही. ही परीस्थिती बदलण्याची गरज प्रकाश वालावलकर यांनी व्यक्त केली. शेतकरयांच्या काजुला योग्य दर मिळावा यासाठी संघटनेमाफॅत पाऊले उचलण्यात येतील. त्यासाठी शेतकरयानीही संघटनेच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन केले. विलास सावंत यांनी योग्य भावाने काजु खरेदी करणारे खरेदीदार संघटनेमाफॅत शोधण्यात येत आहेत. प्राथमिक चचाॅही या खरेदीदाराशी झाली आहे. मात्र तेवढा काजु मिळाला पाहीजे. त्यासाठी गाववार काजु देणारया शेतकरयांची यादी तयार करावी असे आवाहन केले. उत्तम देसाई यांनी शेतकरी चांगला भाव देणारया खरेदीदाराला थेट काजु विकतात. मात्र खरेदीदारावर दबाव येतो. त्यामुळे थेट विक्रीवर परीणाम होतो. अशा खरेदीदारावर दबाव आणुन दर पाडले जातात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शेतकरयात फुट पाडुन आपला फायदा करुन घेणारयांपासुन सावध राहीले पाहीजे. जगदेव गवस यांनी योग्य भाव मिळेपयॅत काजु बाजारात विक्रीसाठी शेतकरयानी आणु नये असे आवाहन केले. सुरेश गावडे, प्रकाश वालावलकर अभीलाश देसाई यांनी योग्य भाव मिळावा यासाठी प्रथम व्यापारी, कारखानदार यांच्याशी चचाॅ करावी. त्यात तोडगा न निघाल्यास पुढील भुमिका घ्यावी अशी सुचना मांडली. जगदेव गवस यांनी गतवषीॅ ९० रुपयापयॅत दर काजुला देण्यात आला. मात्र काजु गराचा दर ९००रुपये प्रतिकिलोच आहे. शेतकरयाना काहीच फायदा मिळत नाही. हे चित्र बदलण्याची आवश्यकता विषद करतानाच कारखानदारांचा जीएसटी परतावा शासन देते. त्याचाही शेतकरयाना फायदा होत नाही असे सांगितले. नितीन ऊफॅ दिवाकर मावळणकर यांनी परदेशातील स्वस्त काजु आणुन येथील काजुच्या दराने विकला जातो. त्यामुळे येथील काजु कमी भावाने खरेदी होतो. त्यासाठी परदेशातील काजुचा आणि येथील काजुचा गर वेगळा करुन विकला पाहीजे. त्यामुळे काजुच्या गराची चव ग्राहकांना कळेल. ज्या चवीचे आणि ज्या दजाॅचे काजु गर खरेदी ग्राहकांना खरेदी करता येईल. त्यामुळे स्थानिक काजुला दरही मिळेल. स्थानिक काजुला जीआय मानांकन आहे. त्याचा फायदा घेतला पाहीजे असे सांगितले. काजुला किमान आधारभुत किंमत मिळावी , काजु बोंडावर प्रक्रीया उदयोगाना चालना मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे बैठकित ठरले. प्रामुख्याने काजुला यंदाच्या हंगामात याेग्य भाव मिळावा याबाबत बैठकित चचाॅ झाली. यावेळी डेगवे सरपंच वैदही देसाई, उपसरपंच प्रवीण देसाई, गुरुनाथ नाईक, अजित देसाई,दशरथ घाडी, सुभाष देसाई, सौरभ सिध्दये, कमलाकर देसाई , मधुकर गावकर, अरुण पंडित, घनश्याम नाईक,अतुल पंडित , नरसिंह देसाई,निलेश परब उपस्थित होते.