You are currently viewing दीपज्योत

दीपज्योत

*🔥🪔🌞जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना 🌞🪔🔥*

 

*”दीपज्योत”*

ज्ञानदीप लावू या जगांत

दूर जाती तिमिर अज्ञान।।धृ।।

 

प्रेम ज्ञान देत दीपज्योत

त्याग एकाग्रता शिकवे ज्योत

अविचल राहती सद्गुण।।1।।

 

प्रकाश ना पाहे अंधार

सूर्याला ना दिसते रात्र

चैतन्य देई दीप सतत ।।2।।

 

उंबर्‍यावर दीप ठेवू तेवत

उजेड पडेल बाहेर आंत

लाभे वैराग्य शुद्धता आनंद।।3।।

 

लावतात दीप सर्व कार्यांत

दिप जाळी विक्षेप तमोगुण

प्रज्वलन करिते हवा शुद्ध।।4।।

 

लक्ष्मी वसते दीप तेजांत

टळते शत्रुबुद्धी संकट

सुयश लाभते औक्षणानंII5II

 

दिपाची आभा राहे नेत्र सुखद

नश्वरतेतून दावी शाश्वत चैतन्य

देशभक्तीची ज्योत ठेवूया तेवतII6II

 

काव्य:श्री अरुण गांगल कर्जत रायगड.महाराष्ट्र.

पिन.410201.Cell9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा