You are currently viewing याद येस दिवाईनी…

याद येस दिवाईनी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*याद येस दिवाईनी…*

 

दिवाईनं मुई ऊनं भाऊ उना मना दारे

जीव हारकी गया नि भाऊ बरा से ना तू रे

आते वय हुई गये तरी हारिक दाटस

२/४ दिन जावो ऱ्हावो असं मनले वाटस…

 

हात पाय थकनात घर हुवा नि नातरे

लेक येस माहेरले जीव तिनाभी कातरे

धावपय करी येस चार दिन त्या खुशीना

मांगे पोट पसारा तो तिन्हं ऱ्हावानं जमेना…

 

ती येस माहेरले कसं आपुन जावो आते

भाऊन बी गोकुय ते त्याना घरम्हा खेये ते

चार दिन त्या येतसं मंग गावले जातसं

मनम्हाज ठी लेवो लेवो कल्पना करी ते..

 

मायबाप ना राजम्हा काढी सवड जावूत

आते मनम्हा ऱ्हातसं मना मनम्हाना बेत

आत्या दूर दूर जास लेक नातरेसनी जत्रा

मन शांत ठेवो आते हाई दुखवरनी मात्रा…

 

आपला घरज दिवाई आपला घरज आखाजी

दारम्हाज वाट दखे माय आठवन ताजी

तवय ऱ्हावानं जमेना ग्यात दूर दूर निंघी

गुईना सोजीना त्या लाडू माले आवडेत वजी…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा