You are currently viewing आरोग्य सेवेतील ६७ संगणक ऑपरेटर कर्मचाऱ्यांचे पुन्हा सेवेत रुजू करून घेणे संदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर

आरोग्य सेवेतील ६७ संगणक ऑपरेटर कर्मचाऱ्यांचे पुन्हा सेवेत रुजू करून घेणे संदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर

आरोग्य सेवेतील ६७ संगणक ऑपरेटर कर्मचाऱ्यांचे पुन्हा सेवेत रुजू करून घेणे संदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर

सिंधुदुर्गनगरी :

यशस्वी अकॅडेमी फॉर स्कील, पुणे या बाह्य संस्थेमार्फत जिल्ह्यात गेली दोन वर्षांपासून कार्यरत असलेल्या ६७ संगणक ऑपरेटर यांना अचानक कमी करण्याबाबत कळविल्याने, दिवाळीच्या तोंडावर या संगणक ऑपरेटरांवर उपासमारीची वेळ आली आहे. आरोग्य विभागाचे ‘आयुष्यमान भव’ यासह ऑनलाईन पद्धतीची कामे यामुळे ठप्प होणार आहेत. आम्हा कर्मचाऱ्यांना पुन्हा दुसऱ्या योजनेत किंवा अन्य संस्थेमार्फत संधी मिळावी, अशी मागणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. याबाबत न्याय देण्याचे आश्वासन संबंधितांना दिले आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागाचे सध्या कंत्राटी पद्धतीने बरेचसे काम सुरू आहे आणि यशस्वी अकॅडेमी सारख्या बाहय संस्था मार्फत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने आरोग्य सेवेचे काम करत आहेत गेले दोन वर्षांपूर्वी या बाह्य संस्थेमार्फत जिल्ह्यातील ६ ७ कर्मचाऱ्यांना संगणक ऑपरेटर कामावर घेतले होते परंतु गेल्या दोन दिवसांपूर्वी यशस्वी अकॅडमी फॉर स्किल पुणे या बाह्य संस्थेने आपल्याला कमी करण्यात येणार असल्याचे कळविल्याने जिल्हयातील ६७ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. एक तर जिल्ह्यात बेरोजगारी वाढती आहे आणि गेले दोन वर्षे उत्तम प्रकारे सेवा देणारे या संगणक ऑपरेटरांमार्फत आरोग्य विभागाचे ऑनलाइन काम पत्रव्यवहार तसेच आयुष्यमान भारत योजनेचे ही काम सुरू आहे अचानक कामावरून काढून टाकण्याबाबत आलेल्या सूचनेमुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना रोजगारापासून वंचित राहावे लागणार आहे , याप्रश्नी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची त्यांनी भेट घेऊन आपण गेले दोन वर्षे यशस्वी अकॅडमी या बाह्य संस्थेमार्फत शासकीय आरोग्य संस्थेमध्ये संगणक ऑपरेटर या पदावर सेवा देत आहोत परंतु शासनाच्या प्रशिक्षणार्थी धोरणानुसार सदर ऑपरेटरांना दोन वर्षाच्या प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण झाल्याने कार्यमुक्त करण्यात येत आहे असे कळविले आहे ,त्यामुळे सद्यस्थितीत आरोग्य विभागाचे कामकाजही ठप्प होणार आहे या बेरोजगारांना एक रोजगाराचे साधन म्हणून उपलब्ध झालेल्या सेवेपासून आणि तुटपुंजा मानधनावर विद्या वेतनात मिळणारे मानधनावर घर खर्च सांभाळत असत अचानक या बेरोजगाराचे संकट आल्याने आपले एकमेव असलेले मिळकतीचे साधन बाह्य संस्थेमार्फत हिरावून घेतले गेले आहे त्यामुळे आम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे जरी हे प्रशिक्षण असले तरी या प्रशिक्षणार्थी म्हणून या सेवेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध होईल अशा आशेने आम्ही हे काम स्वीकारले होते परंतु आम्हाला कार्यमुक्त केल्याने आम्ही हवालदिल झालो आहोत ,आपण आपल्या स्तरावर आम्ही आहोत त्या ठिकाणी कंत्राटी किंवा अन्य कोणत्याही योजनेमध्ये सामावून घेऊन आमची होणारी उपासमारी थांबवावी व न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावर आपण योग्य तो तोडगा काढून न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी ऐश्वर्या कदम, धनंजय पवार ,दिनेशकसालकर ,अपर्णापवार ,हरेश पवार , उज्वलाजाधव ,स्वरा लाड, ललीत वालावलकर, आरोही धुरी, शुभम सावंत, अजय कांबळे, पुजा दळवी आदीसह संगणक ऑपरेटर उपस्थित होते.

संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा