You are currently viewing खा. विनायक राऊत यांच्याबद्दल परत अश्लील शब्द वापराल तर शिवसैनिक निलेश राणेंना फटकावतील – आ. वैभव नाईक

खा. विनायक राऊत यांच्याबद्दल परत अश्लील शब्द वापराल तर शिवसैनिक निलेश राणेंना फटकावतील – आ. वैभव नाईक

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल परत अश्लील शब्द वापराल तर शिवसैनिकच निलेश राणेंना फटकावतील खा. विनायक राऊत हे शिवसेनेचे सचिव व आमचे नेते आहेत. यापुढे जर असे आरोप त्यांच्यावर झाले तर जशास तसे उत्तर दिले जाईल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शांततेचे वातावरण बिघडले तर याची सर्वस्वी जबाबदारी निलेश राणेंना प्रदेश सचिव केलेल्या भाजप पक्षाची राहील. याची नोंद भाजप पक्षाने घ्यावी.असा इशारा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
आमदार वैभव नाईक पुढे म्हणाले, खासदार विनायक राऊत यांना २ वेळा जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. निलेश राणेंना त्यांनी २ वेळा धूळ चारली. खा. विनायक राऊत यांच्या माध्यमातून मोठं मोठी विकास कामे सिंधुदुर्ग जिल्हयात होत आहेत.गेले अनेक वर्षे रखडलेला चिपी विमानतळ प्रकल्प पूर्ण होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात आहे. घोटगे सोनवडे घाट रस्ता, तसेच रस्ते, ब्रिज, वीज ,पाणी, या सुविधा त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात पुरविण्यात येत आहेत. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या समस्या ते सोडवित आहेत. सहज उपलब्ध होणारे खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. देशातील उकृष्ठ कामगिरी करणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश आहे. मतदारसंघातील प्रश्न ते तडफदारपणे लोकसभेत मांडत आहेत.
असे असताना केवळ प्रसिद्धीसाठी निलेश राणे त्यांच्यावर आरोप करून सिंधुदुर्गात दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहेत.दोन वेळा झालेल्या पराभवामुळे निलेश राणे यांच्यात कुठली हिंमत अथवा कुवत राहिलेली नाही. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त आहेत.असे आ. वैभव नाईक म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा