*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आली दिवाळी*
आकाशाचे गीत गात
सांगत आली प्रभात
उठा लवकरीआता करा
साफसफाई ला सुरुवात।
आली दिवाळी आली दिवाळी
फराळाची छान करा तयारी
चकल्या, करंज्या,अन् कडबोळी
साग्रसंगीत सरंजाम लवकरी।
चिवडा, लाडू, शेव, पापडी
अनारसे, तिरोळ्या, पाकपुरी
गुलाबजाम,रसगुल्ले,बाकरवडी
मोहनथाळ,हलवा, भेळपुरी।
किती वर्णाव्या पाककृती किमया
सजावट,रंगरंगोटी,आकाशदीप
मोहक रंगावलीने अंगणे सजवूया
सुगंधित देव्हार्यात तेवती दीप
द्वारी नक्षीदार तोरणे बांधु या
सुखसमृद्धी ने प्रवेशती घराघरांत
प्रसन्नमंगल ऐश्वर्यलक्ष्मी पाऊले
हर्षोन्मादे दीपोत्सव होई साजरा
आतषबाजी ,दारोदारी दीपप्रज्वले
दिवाळी येता घरा! 💥💥💥
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
मुंबई विरार
