*वेंगुर्लेत वसुबारस सणाच्या निमित्ताने ठिकठिकाणी गोमातेचे पुजन करुन उत्साहात साजरा करण्यात आला .*
*हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या आवाहनाला हिंदुधर्मीयांचा उस्फूर्त प्रतिसाद …..*
वेंगुर्ले
दिवाळीची सुरवात धनत्रयोदशी ने होत असली तरी हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे वसुबारस या सणाला देखील महत्त्व आहे. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन ) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
हिंदू धर्मात गायीला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. गाय ही सात्त्विक आहे म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्याला पावन करणे तसेच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करते. शेतीला खत देऊन पौष्टिकत्व देते, त्यामुळे या पूजनाद्वारे गायीच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार केला .
याच निमित्ताने वेंगुर्लेत हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने गोमाता पूजनाचे आवाहन हिंदुधर्मियांना केले होते , या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ले शहराबरोबर ग्रामीण भागातही सकाळपासून गोमातेचे पुजन करुन पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला .
