कुडाळ :
शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘शिवउद्योग संस्था कोकणी महोत्सव’ या भव्य उपक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग राजा मैदानावर झाले. कोकणातील खाद्यसंस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सांगता १८ ऑक्टोबरला होणार आहे.
या महोत्सवामध्ये कोकणात तयार होणाऱ्या सर्व पारंपरिक खाद्यपदार्थांचे आणि विविध गृहउद्योगांच्या वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या उपक्रमात महिला बचत गट आणि स्थानिक लघुउद्योगांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले आहे.
शिवसेनेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच यशस्वीरित्या राबविण्यात आला असून, प्रदर्शनात एकूण २३ स्टॉल्स लावण्यात आले आहेत. आयोजकांनी पुढील काळातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याचे आश्वासन दिले आहे.
महोत्सवाचे समन्वयक रचना नेरुरकर यांनी सांगितले की, “स्थानिकांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे. या महोत्सवामुळे बचत गटांना आणि गृहउद्योगांना मोठा आधार मिळत आहे.”
शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांनी सांगितले की, हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबविला जाणार आहे.
महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विकास गावकर आणि अरविंद करलकर, शिवसेना पुरा तालुकाप्रमुख तथा महोत्सव समन्वयक रचना नेरुरकर, शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल, कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे आणि दीपक नारकर, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, युवा तालुकाप्रमुख सागर वालावलकर आणि अनिकेत तेंडुलकर, युवती तालुकाप्रमुख दीपाली कानसे, तालुका सचिव रेवती राणे, शहराध्यक्ष श्रुती वर्दम, तालुका संघटक रोहित भोगटे, विभाग प्रमुख सौरवी चव्हाण, उपतालुकाप्रमुख पूजा तेंडुलकर, शिवउद्योग उपतालुकाप्रमुख राजन तोंडवलेकर, शिवउद्योग संघटना युवती सरिका कदम, शिवा उद्योग उपतालुकाप्रमुख पूजा तेंडुलकर, राजन भगत, प्रसन्ना गंगावणे, जयदीप तुळसकर, राकेश नेमळेकर, राकेश कांदे, चंदन कंबळी, चेतन पडते, सिद्धेश परब, रंजिता नेरुरकर आदी मान्यवर व स्टॉलधारक उपस्थित होते.
अभूतपूर्व प्रतिसादामुळे महोत्सव यशस्वीरित्या सुरू असून, सिंधुदुर्गवासीयांना कोकणी परंपरा आणि स्थानिक उत्पादनांचा अनोखा मेळा अनुभवायला मिळत आहे. या महोत्सवाची सांगता १८ ऑक्टोबरला होणार आहे.
