कणकवलीत दिवाळी बाजाराचे उत्साहात उद्घाटन;
४० स्टॉल्सना ग्राहकांचा प्रतिसाद
कणकवली
कणकवली शहर भाजप व समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बाजाराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजस रेगे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. हे बाजार १९ ऑक्टोबरपर्यंत पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलाखाली सुरु राहणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, बंडू हर्णे, अर्जुन राणे, किशोर राणे, अण्णा कोदे, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, चारु साटम, संजय कामतेकर, विराज भोसले, प्रद्युम मुंज, निधी निखार्गे, सुनील नाडकर्णी, लवू पिळणकर, परेश परब, मनोहर पालयेकर, राजन भोसले, सखाराम सकपाळ, भालचंद्र मराठे, संजीवनी पवार, भारती पाटील, स्मिता कामत, प्रिया सरूडकर, क्रांती लाड, संजीवनी आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळी बाजारात एकूण ४० स्टॉल्समध्ये घरगुती फराळ, आकर्षक आकाशकंदील, मातीच्या पणत्या तसेच विविध हस्तकला वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. कणकवली शहर आणि परिसरातील बचतगट, स्थानिक कलाकार व कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मागील आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे, अशी माहिती समीर नलावडे यांनी दिली.
ग्राहकांकडून बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत असून दिवाळीच्या खरेदीसाठी हे केंद्र आकर्षण ठरत आहे.
