दशावतार टिकवण्यासाठी प्रयत्नांची ग्वाही –
फोंडघाटमध्ये रंगला भव्य दशावतार कार्यक्रम
फोंडघाट (ता. मालवण)
येथे काल भव्य दशावतार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मनोज रावराणे, कानडे साहेब आणि अजित नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर रसिक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती, संपूर्ण हॉल प्रेक्षकांनी भरून गेला होता.
दशावतार कला जपण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्यामार्फत प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी अजित नाडकर्णी यांनी दिली. यावेळी दोन दशावतार कलावंतांच्या अकाली निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नाट्यप्रयोग भावपूर्ण वातावरणात सादर झाला.
विशेष म्हणजे, भविष्यात दशावतारासाठी हॉलची गरज भासल्यास तो विनामूल्य देण्यात येईल, असे आश्वासन अजित नाडकर्णी यांनी दिले. “आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेला हा हॉल ही सामाजिक बांधिलकीची खूण आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नट आणि टीमला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हा उपक्रम ‘अजित नाडकर्णी शुभांजित सृष्टी’च्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
