शिवसेना मालवण तालुका सरचिटणीस पदी श्री. चंद्रकांत गोलतकर यांची नियुक्ती
मालवण
विधानसभा निवडणुकीत यशस्वी जबाबदारी सांभाळून सर्व पदाधिकारी कार्यकते यांच्यात एकसंघ संघटन कौशल्य दाखवून आचरा मतदार संघाची यशस्वी घोडदौड करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे श्री.चंद्रकांत गोलतकर यांची आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मालवण सरचिटणीसपदी पदी नियुक्ती करण्यात आली .
त्यावेळी जिल्हाप्रमुख श्री.दत्ताजी सामंत, उपजिल्हाप्रमुख श्री. महेश राणे, तालुका प्रमुख श्री. विनायक बाईत, विभाग प्रमुख श्री. संतोष कोदे,उपविभाग प्रमुख श्री.भाऊ हडकर, आचरा सरपंच श्री. जेरोंना फर्नाडिस, उपसरपंच श्री. संतोष मिराशी, श्री. बाबू परुळेकर, बाबु कदम, ग्रा.सदस्य चंदु कदम, चावल मुजावर, रुपेश , अभय हडकर, सचिन हडकर, पंकज आचरेकर, अभि सावंत,उदय घाडी आदी उपस्थित होते.



