प्राधिकरण –
दि. १४ ऑक्टोबर रोजी “शब्दरंग कला साहित्य कट्टा”, या साहित्यप्रेमी मंडळींच्या तिसऱ्या दिवाळी अंकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.श्री तुकाराम पाटील यांच्या शुभहस्ते झाले. दर्जेदार साहित्य निर्मिती साठी असे अंक निघाले पाहिजेत, दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणारा हा अंक आहे असे गौरवोद्गार श्री.पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले! या दिवाळी अंकातील साहित्याचे अतिशय सुंदर विवेचन त्यांनी केले.
शब्दरंग कला साहित्य कट्ट्याच्या अध्यक्षा सौ ज्योती कानेटकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या भाषणात दिवाळी अंक ही शब्दरंग साठी अत्यन्त अभिमानाची गोष्ट आहे असे सांगितले. दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक श्री. सुभाष भंडारे यानी दिवाळी अंकाची निर्मिती करताना अतिशय आनंद मिळाला असे प्रतिपादन केलें.
श्री श्रीकृष्ण धारप आणि श्री. चिंतन मोकाशी यांनी अंक उत्तम व्हावा यासाठी खूप मोठे योगदान दिले.
अतिशय नेटक्या सोहळ्याला शब्दरंग कला साहित्य कट्ट्याची संपूर्ण कोअर टीम आणि सभासदांसोबत शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने उल्लेखनीय असे. सुप्रसिद्ध लेखक श्री रमेश वाकनिस, ज्येष्ठ साहित्यिक श्री. राज अहेरराव, सुप्रसिद्ध उद्योजक, श्री अतुल इनामदार, श्री सलीम भाई शिकलगार, श्री बाळा शिंदे, श्री बाळा दानवले, तसेच कट्टयाचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोशी, डॉ. अनिरुद्ध टोंणगावकर हजर होते.
सौ प्रियांका आचार्य यांनी सूत्रसंचालन केले, श्री अशोक अडावदकर यांनी आभार मानले.

