You are currently viewing विचारधारा कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न

विचारधारा कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न

मानवत :

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामूहिक जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती मानवत आयोजित कार्यक्रमामध्ये अध्यक्ष नितीन गवळी आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते विचारधारा (सुरुवात वैचारिक क्रांतीची) या प्रातिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन पार पडले.

ह्यावेळी प्रकशिका रोहिणी माया रामू वाघमारे, संकलक कृष्णा राजू भालेराव, कवी उध्दव परभणीकर आणि कवी गणेश शेळके हे उपस्थित होते.

शिव, फुले, शाहू, आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे ह्यांच्या विचारांना सामान्य माणसांपर्यंत पोहवण्यासाठी केलेला हा उपक्रम ‘विचारधारा’. ह्या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील निवडक कवींच्या निवडक कविता आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा