माजगाव येथे भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी
सावंतवाडी :
सावंतवाडी-बांदा मार्गावर माजगाव तांबळगोठण येथील ऑटो स्पा समोर ब्रेझा कार आणि दुचाकी यांचात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. फारूक हेरेकर (वय ५०, रा. माजगाव गरड) असे त्यांचे नाव आहे. तर यश आनंद पडते (वय २७, रा. शिरोडा नाका, सावंतवाडी) असे ब्रेझा कार चालकाचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेझा कार (MH 07 AG 5204) ही यश आनंद पडते (वय २७, रा. शिरोडा नाका, सावंतवाडी) याच्या ताब्यात होती ती सावंतवाडीहून बांदा दिशेने जात होती. तर दुचाकी (MH 07 AN 5382) बांदाकडून सावंतवाडीच्या दिशेने येत होती. दरम्यान, माजगाव तांबळगोठण येथे दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडकेनंतर ब्रेझा कारने दुचाकीला सुमारे १०० मीटर फरफटत नेले, ज्यामुळे दुचाकीस्वार फारूक हेरेकर (वय ५०, रा. माजगाव गरड) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी गोवा येथील बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा सुरू करण्यात आला आहे.
