You are currently viewing मालवण तालुक्यातील मौजे ओवळीये, सुकळवाड,भरड, धुरीवाडा येथे कंटेन्मेंट झोन

मालवण तालुक्यातील मौजे ओवळीये, सुकळवाड,भरड, धुरीवाडा येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी :

मालवण तालुक्यातील मौजे ओवळीये,कुळकरवाडी, घर क्र. 157 चा परिसर दिनांक 24 सप्टेंबर 2020,  सुकळवाड ग्रामपंचयात घर क्र. 142 चा परिसर दिनांक 24 सप्टेंबर 2020, मालवण शहरात भरड-मालवण घर न्र. 2649 चा परिसर दिनांक 25 सप्टेंबर 2020, धुरीवाडा मालवण साई समर्थ कॉम्प्लेक्स येथील रुम नं. 205 चा परिसर दिनांक 26 सप्टेंबर 2020, भरड – मालवण, घर क्र. 785 चा परिसर दिनांक 26 सप्टेंबर 2020,  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन  म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

सदर कंटेन्मेंट झोनमध्ये संबंधित दिनांकापर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + eight =