संततधार पावसाने सणासुदीची तयारी विस्कळीत,
दिवाळीचा उत्सव होणार साजरा; अजित नाडकर्णीकडून ‘उत्तम’ उपक्रम
फोंडाघाट
फोंडाघाट परिसरात आज दगफुटी सद्रुश जोरदार पाऊस झाला. एका तासाच्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. हवामानाच्या उदास छायेखालीही फोंडाघाटमध्ये दिवाळीचा उत्सव उत्साहात साजरा होणार आहे.
आज अजित नाडकर्णी यांच्या वतीने ‘उटणे, साबण आणि मास्क’ वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे दिवाळीच्या काळात स्वच्छता आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे.
“ही दिवाळी फक्त आनंदाची नाही, तर आरोग्यदायी आणि स्वच्छतेचीही असावी, हा आमचा हक्क आहे,” असं उद्गार अजित नाडकर्णी यांनी काढले.
