रत्नागिरी :
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, रत्नागिरी बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिटयूट आयोजित महिला व मुलींसाठी खास पाचवारी साडीची शिलाई हा उपक्रम राबवण्यात आला. या मध्ये आजकालच्या व्यस्त दैनंदिन महिलांना बाहेर पडत असताना वेळ कश्या प्रकारे वाचवता येऊ शकतो साडी शिऊन लवकरात लवकर कशी नेसता येईल हे शिकवण्यात आले.कौशल्याला उत्साह देत नव्याने काही शिकण्यासाठी रत्नागिरी मधील महिला व मुलींनी या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद देत हा उपक्रम BKVTI अकॅडमी कॉर्डिनेटर कु. साधना ठाकूर यांच्या हस्ते पार पाडण्यात आला.
