You are currently viewing मालवण कट्टाच्या आभाळमाया ग्रुपने दाखवली “आभाळमाया” नृत्याला केली तब्बल 25 हजार रुपयाची आर्थिक मदत.

मालवण कट्टाच्या आभाळमाया ग्रुपने दाखवली “आभाळमाया” नृत्याला केली तब्बल 25 हजार रुपयाची आर्थिक मदत.

मालवण कट्टाच्या आभाळमाया ग्रुपने दाखवली “आभाळमाया” नृत्याला केली तब्बल 25 हजार रुपयाची आर्थिक मदत.

नृत्याच्या उपचारासाठी एक लाख रुपये पर्यंतरची मदत मिळून देणार -रवी जाधव

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून व मित्रमंडळी कडून आतापर्यंत 50 हजार रुपये पर्यंतरची नृत्याच्या उपचारासाठी मदत मिळवून दिली तसेच
मालवण कट्टा येथील आभाळमाया ग्रुपचे सर्वे सर्व राकेश डगरे तसेच त्यांचे मित्र रामचंद्र आंबेरकर यांच्या या ग्रुपच्या माध्यमातून नृत्याला तिच्या उपचारासाठी तब्बल 25 हजार रुपयाची मदत देण्यात आली यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी पुढाकार घेतला होता. वर्तमानपत्र व सोशल मीडियावरच्या आवाहनानंतर त्या चिमुकल्या नृत्याच्या मदतीसाठी सर्व सिंधुदुर्गवासीयांनी तसेच बाहेरून देखील दात्याने पुढाकार घेऊन आर्थिक मदत केली होती आणि ही मदत सुरूच आहे.
नृत्या या दुर्मिळ आजारातून बरी व्हावी तसेच तिच्यावर उपचारासाठी लागणारे रक्कम लवकरात लवकर उभी व्हावी यासाठी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी आपल्या मित्रमंडळींना देखील आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. याही पुढे तिला अशीच मदत मिळवून देण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान प्रयत्नात राहील “आभाळमाया” या ग्रुपचे सर्वे सर्व राकेश डगरे व रामचंद्र आंबेरकर यांचे ब्रेकिंग मालवणीचे संपादक अमोल टेंबकर व सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी आभार आले या प्रसंगी अमोल टेंबकर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा