You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ११९ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ११९ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।

__________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ११९ वे

अध्याय – १९ वा , कविता- ११ वी

___________________________

 

अध्याय हा एकोणवीसावा । सार यातला जाणावा । स्वामी-बोल समजुनी घ्यावा । निजकल्याणासाठी ।।१।।

 

श्रावणमास आला । स्वामींच्या प्रकृतीत बदल झाला ।

आषाढात सर्वांना तो दिसला । जन चिंतीत झाले ।।२।।

 

दिवस तो गणेश चतुर्थीचा । भक्तांसी संवाद स्वामींचा ।

दिवस उद्याचा । गणपती बोळवण्याचा ।।३।।

 

पार्थिव गणपती करोनी । पूजा-अर्चा त्याची करोनी ।

त्यास नैवद्य दाखवोनी ।बोळवावे जलात दुसरे दिवशी ।।४।।

 

जसे वस्त्रास बदलणे । तसेचअसे देह-वस्त्र सोडणे ।

नवे नसे हे घडणे । थोर सारे देहवस्त्रास बदलती ।।५ ।।

 

भक्तांना स्वामी बोलती । आम्ही कुठे ना जाती ।तुम्हास

संभाळण्या प्रती । असुत स्थित इथे ।।६ ।।

 

मी गेलो ऐसें मानू नका । भक्तीत अंतर पाडू नका ।

मज विसरू नका । आहे मी इथेच ।।७ ।।

******

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा