You are currently viewing भंडारा जिल्ह्यात आगीसाठी दोन नर्सचा  निष्काळजीपणा

भंडारा जिल्ह्यात आगीसाठी दोन नर्सचा निष्काळजीपणा

भंडारा येथील रुग्णालयाला आग लागण्यासाठी तेथे ड्युटीवर असणाऱ्या 2 नर्सचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे दिसते अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जानेवारी महिन्यात भंडारा येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये दहा बाळांचा मृत्यू झाला होता.

 

याबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले, “रात्री साधारण 12 मिनिटांच्या काळामध्ये एक लहानसा स्पार्क इथं झाला. त्यानंतर तो वाढत गेला आणि आग लागली. त्यावेळेस मुलं जिथं ठेवली होती तिथे दोन नर्सेसची ड्युटी होती. ड्युटीच्या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहाणं आवश्यक होतं. मात्र त्या जागेच्या बाहेर होत्या. त्या दोघी त्यावेळेस काय करत होत्या, त्यांच्या फोनच्या डिटेल्सवरुन शोधण्यात येत आहे.

यापूर्वी “भंडाऱ्यातील घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीची चौकशी पूर्ण झाल्यावर रिपोर्टच्या आधारे दोषींवर कारवाई करू. राज्यातील सर्व रुग्णालयात फायर ऑडिट, स्ट्रक्टरल ऑडिट केलं जाईल,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

“भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आगीच्या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” असंही राजेश टोपे यांनी म्हटलं होतं.

तर “भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या घटनेची उच्च स्तरीय चौकशी जाहीर करण्यात आली आहे. आगीच्या कारणांची चौकशी तज्ज्ञ मंडळी करत आहे. जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.

नेमकं काय घडलं?

रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आलं. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितलं असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा