शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

आमदार वैभव नाईक यांची माहिती

​​पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्यासह संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी राहणार उपस्थित

कणकवली​​ :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी ​५.४५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या ​’​शासकीय वर्षा​’​ या निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पुढे काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा