*वेंगुर्ल्यातील चार आरोग्य केंद्र व दोन उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण साहित्य प्रदान*
वेंगुर्ला :
भारतीय जनता पार्टीच्या ध्येयधोरणावर चालताना यावर्षी विशाल परब यांनी आपला वाढदिवस कोणत्याही धुमधडाक्याच्या कार्यक्रमात नव्हे, तर विविध समाजोपयोगी उपक्रमांमधून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळेच त्यांनी वेंगुर्ले तालुक्यातील आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय यामध्ये सर्व सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन वाढदिवसाच्या निमीत्ताने रुग्ण साहित्य प्रदान करणार आहेत. जेणेकरुन आरोग्य विषयक असलेल्या समस्या दुर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

