सुचेतस आर्ट्स आयोजित, ‘कलगी तुरा.. कवितेचा २०२५!’ आजच आपली प्रवेशिका भरा…
बिजलीनगर चिंचवड –
महाराष्ट्रातील कविंना प्रोत्साहन द्यावे, त्यांचे वेगळेपण सिध्द व्हावे या उद्देशाने ‘सुचेतस आर्ट्स’ ने “‘कलगी तुरा.. कवितेचा’ ही राज्यस्तरीय विशेष स्पर्धा सुरू केली आहे. यात तुम्ही कवितेतून तुमचे मत मांडायचे आहे, ज्याला समोरचा कवी कवितेतूनच उत्तर देईल. ही ऑफलाइन सांघिक सवाल-जवाब स्पर्धा आहे. अशा प्रकारची स्पर्धा महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयोजित केली जात असल्याचे सुचेतस आर्टसच्या डायरेक्टर विनिता माने – पिसाळ यांनी सांगितले. मर्यादित प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत. स्पर्धा फेब्रुवारीत चिंचवड पुणे इथे होणार आहेत.
मानाचा कलगी तुरा ट्रॉफी, सन्मानपत्र व रोख रक्कम असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार सांघिक व वैयक्तिक स्वरूपात असतील.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुचेतस आर्ट्स च्या वेबसाईटवर् अथवा व्हॉटसअपवर माहिती घ्यावी संपर्क – 9309770898 किंवा 7709073008 (www.suchetasindia.in)असे संयोजक विनिता माने पिसाळ यांनी सांगितले.
