आर.पी.आय.चा 68 वा वर्धापन दिन 3 नोव्हेंबरला महाड क्रांतीभूमीवर;
जिल्हा कार्यकारिणी बैठकीत नियोजनाबाबत चर्चा!
विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा 68 वा वर्धापनदिन येत्या 3 नोव्हेंबर 2025 रोजी क्रांती भूमी महाड येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम.डॉ.रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे,तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव- रमाकांत जाधव व जिल्हाध्यक्ष -अजितकुमार कदम यांनी दिली.
रमाकांत जाधव व अजित कदम यांनी सांगितले की,पक्षाचा वर्धापन दिन हा 3 ऑक्टोबर ला नियोजित होता,परंतु अवकाळी पावसाने संपूर्ण राज्याच्या विविध जिल्ह्यांना झोडपले आहे,शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे,अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम.रामदास आठवले यांच्या आदेशाने 3ऑक्टेबरचा कार्यक्रम 3 नोव्हेंबर 2025 ला घेण्याचे निश्चित करण्यात आला आहे.
पक्षाची जिल्हा बैठक कुडाळ येथील एम.आय.डी.सी .गेस्टहाऊस मध्ये रमाकांत जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व अजितकुमार कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जि.प.,पं.स.,नगर पंचायत,नगरपरिषद निवडणूकी बाबत चर्चा करण्यात आली, तसेच पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांचा तालुका संपर्क दौरा ठरविण्यात आला.
बैठकीला पक्षाचे जिल्हा संघटक-ॲड.एस.के.चेंदवणकर,जिल्हा उपाध्यक्ष-संजय यादव,जिल्हा खजिनदार-आनंद पेंडूरकर,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगरसेविका -सौ.ज्योती रमाकांत जाधव,जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा तथा सासोली ग्रा.पं.सदस्या -जागृती सासोलकर,जिल्हा महिला आघाडी खजिनदार-सौ.समेधा निगुडकर,वैभववाडी तालुका अध्यक्ष-रविंद्र जंगम,दोडामार्ग तालुका कार्याध्यक्ष-प्रेमानंद पालयेकर,मालवण तालूकाध्यक्ष-अविनाश कासले, मालवण तालुका खजिनदार -धर्मेंद्र जंगम,वैभववाडी तालूका कार्याध्यक्ष-सुरेश भोसले, सचिव-संदिप जाधव आदि पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
