You are currently viewing नृत्याच्या उपचारासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व सत् संकल्प कडून 17 हजाराची आर्थिक मदत.

नृत्याच्या उपचारासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व सत् संकल्प कडून 17 हजाराची आर्थिक मदत.

नृत्याच्या उपचारासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व सत् संकल्प कडून 17 हजाराची आर्थिक मदत.

सावंतवाडी

निमोनिया सारख्या आजाराने गंभीर झालेल्या सावंतवाडी येथील चिमुकल्या नृत्या जांभेकर यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून 12 हजार तर सत् संकल्प यांच्याकडून 5 हजार इतक्या रकमेचा धनादेश जांभेकर यांचे मित्र अमोल टेंबकर यांच्याकडे देण्यात आला.
कोल्हापूर येथील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे तिच्यावर उपचार सुरू आहे सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा सुरू आहे. नृत्याच्या आजारपणाची बातमी वृत्तपत्र व तसेच शहरातील इतर सर्वच सोशल मीडियातून प्रसारित झाल्यामुळे शहरातून गावागावातून नृत्याच्या उपचारासाठी मदतीसाठी हात पुढे आले. या सर्व दात्यांच्या कृपा आशीर्वादाने नृत्याला नक्कीच नवसंजीवनी मिळेल अशी आशा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी व्यक्त केली. याही पुढे तिला आम्ही मदतीसाठी प्रयत्न करू असेही ते म्हणाले तसेच गीता ऑप्टेशनचे हेमंत रेडकर व ईशान बुरान यांनीही मदत देऊन खारीचा वाटा उचलला.
याप्रसंगी अमोल टेंबकर, भुवन नाईक, खुशी रेडकर दर्शना पेडणेकर एस पी नाईक,सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, सचिव समीरा खालील, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सदस्य रूपा गौंडर (मुद्राळे) शेखर सुभेदार व रवी जाधव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा