You are currently viewing सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) सज्ज

सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) सज्ज

विधानसभा निवडणुकीनंतर संघटन पुन्हा मजबूत; आवश्यक असल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी – जिल्हाध्यक्ष अमित सामंत

सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीनंतर मोठा संघर्ष सोसावा लागला असला तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) सज्ज झाली आहे. सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडे उमेदवार निश्चित आहेत, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.

सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा, तालुका आणि शहरस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. सामंत म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र आता संघटन पुन्हा उभे राहिले आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही पूर्ण तयारीत आहोत. आवश्यक असल्यास आम्ही स्वतंत्रपणेही लढू शकतो.

महाविकास आघाडीचा निर्णय मात्र वरिष्ठ पातळीवरून होणार असून, स्थानिक पातळीवरही त्याबाबत चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीवेळी कोणावरही कारवाई झालेली नसल्याचे सांगताना सामंत म्हणाले, अर्चना घारे-परब पक्षातच आहेत. आज त्या प्रदेश बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

या पत्रकार परिषदेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, तसेच सुदेश तुळसकर आणि रवीकिरण गवस उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा