You are currently viewing दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उमलावी यासाठी भाजपा युवा नेते विशाल परब संकल्पशील

दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उमलावी यासाठी भाजपा युवा नेते विशाल परब संकल्पशील

*दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उमलावी यासाठी भाजपा युवा नेते विशाल परब संकल्पशील*

*भारतीय जनता पार्टी व दिव्यांग विकास आघाडीमार्फत विशालभाई परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात दिव्यांगांना शिधा वाटप कार्यक्रम आयोजित*

*भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची माहिती*

भारतीय जनता पार्टी आणि दिव्यांग विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे दिव्यांगाना शिधावाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाजपा युवा नेते मा.विशालभाई परब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता साईमंगल कार्यालय सभागृह वेंगुर्ला येथे हा कार्यक्रम होणार असून जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.

भाजपा युवा नेते श्री विशालभाई परब यांनी मराठवाडा पुरग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहानुभूती राखत यावर्षी आपला कार्यक्रम कोणत्याही जल्लोषपुर्ण कार्यक्रमाने साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ते आपली मदत देणार आहेत. मात्र सावंतवाडी मतदारसंघात विविध सामाजिक सेवा-कार्यक्रम व उपक्रमाद्वारे त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. त्यानुसार श्री विशाल परब यांच्या संकल्पनेतून, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, भाजपा खासदार माननीय नारायणराव राणे साहेब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री नितेशजी राणे साहेब आणि भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकरजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी व दिव्यांग विकास आघाडी दिव्यांगांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबवत असते. आपल्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगाना शिधा वाटप करण्याची संकल्पना विशाल परब यांनी मांडली आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टी व भाजप दिव्यांग विकास आघाडीच्या आयोजनाखाली दिव्यांगांना १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले येथील साईमंगल हॉलमध्ये हा कार्यक्रम सोहळा होणार आहे , तरी वेंगुर्लेतील जास्तीत जास्त दिव्यांगांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे व भाजपा तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब यांनी केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा