You are currently viewing “वैयक्तिक आचरणातून धर्म जागवा” – डॉ. संजय उपाध्ये यांचे स्पष्ट विचार ७१व्या मासिक व्याख्यानात

“वैयक्तिक आचरणातून धर्म जागवा” – डॉ. संजय उपाध्ये यांचे स्पष्ट विचार ७१व्या मासिक व्याख्यानात

“वैयक्तिक आचरणातून धर्म जागवा” – डॉ. संजय उपाध्ये यांचे स्पष्ट विचार ७१व्या मासिक व्याख्यानात

गांधी पेठ तालीम मित्रमंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मासिक व्याख्यानमालेतील ७१व्या व्याख्यानात गुरुदेव डॉ. संजय उपाध्ये यांनी “वैयक्तिक आचरणातून धर्म जागवा” हा महत्वपूर्ण संदेश दिला.

आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी सांगितले की, इंग्रज भारतात राज्य करण्याच्या हेतूने आले असले तरी त्यांचा खरा उद्देश धर्मप्रसार हाच होता. आपल्या समाजातील जातीभेद आणि उच्चनीचतेमुळे सनातन धर्माचे नुकसान झाले असून, त्याचा फायदा घेत परकीय धर्मांचा प्रसार सुलभ झाला.

डॉ. उपाध्ये म्हणाले की, “भारतीय सनातन तत्वज्ञान हे सहिष्णू असले तरी टोकाच्या अहिंसक भूमिकेमुळे आपलेच नुकसान झाले आहे. आपणच स्वतःवर हिंसा करून घेणारी आत्मघातकी वृत्ती जोपासली आणि त्यामुळे आपली लोकसंख्या कमी झाली. आज धर्म, राजकारण आणि व्यक्तिगत आयुष्य हे परस्परावलंबी घटक आहेत. जोपर्यंत व्यक्ती धर्माचरण करीत नाही, तोपर्यंत राजकारण आणि राजकारणी सुधारणार नाहीत.”

त्यांनी पुढे नमूद केले की, लोकशाहीमध्ये बहुसंख्येला महत्त्व असते, त्यामुळे धर्मवाढीसाठी प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक आयुष्यातून प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक आठवड्याला धर्म, संस्कृती आणि परंपरांचे स्मरण करणाऱ्या उपक्रमांतून समाजजागृती घडवून आणणे गरजेचे आहे.

या कार्यक्रमास ह.भ.प. किसन महाराज चौधरी, नाट्य परिषदेचे किरण येवलेकर, ज्येष्ठ साहित्यिक तानाजी एकोंडे, भारत केसरी विजय गावडे, कुस्तीगीर महासंघाचे सचिव संतोष माचुत्रे, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे उत्तम दंडी, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे माजी सदस्य गतिराम भोईर, व्याख्यानमाला समन्वय समितीचे राजेंद्र घावटे व बी.आर. माडगूळकर, तसेच सरलालबाग दूर शास्त्री मंडई, पिंपरीचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ कुदळे हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन राजाभाऊ गोलांडे व सुहास पोफळे यांनी गांधी पेठ तालीम मित्रमंडळाच्या वतीने केले.
कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये वैचारिक जागृती आणि सनातन धर्माच्या मूलमूल्यांविषयी आत्मचिंतन घडवून आणले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा