You are currently viewing कणकवली गणपती साना इथं राबविली स्वछता मोहीम स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट यांचा पुढाकार

कणकवली गणपती साना इथं राबविली स्वछता मोहीम स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट यांचा पुढाकार

कणकवली गणपती साना इथं राबविली स्वछता मोहीम
स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट यांचा पुढाकार

कणकवली

संत निरंकारी मिशचे सदगरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या वतीने स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट अमृत कार्यक्रम अंतर्गत कणकवली शहरातील गणपती साना येथे स्वछता मोहीम राबविण्यात आली. यावेळी या स्वछता मोहिमेत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आपला सहभाग दर्शवत स्वयंसेवाकन सोबत स्वछता केली.

गणपती साना येथील परिसर स्वच्छ करत. समजासमोर स्वच्छतेचा आदर्श ठेवला. हे स्वछता मिशन या संत निरंकारी मिशनचे सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज व स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट यांच्या वतीने संपूर्ण देशभरात राबवत आहेत त्यांच्या या सेवाभावी कार्याचे संपुर्ण दिवभरातून कौतुक केले जात आहे. कणकवली तालुक्यातील या मिशनच्या स्वयंसेवकांनी ही स्वछता मोहीम शहरातील गणपती साना या ठिकाणी राबवत तो परिसर स्वच्छ केला.

या सेवाभावी उपक्रमाबद्दल युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच स्वछता मोहिमेत सहभागी झाल्याबबद्दल निरंकारी मंडळाकडूनसुशांत नाईक यांचे आभार मानन्यात आले. यावेळी निरंकारी मंडळाचे स्वयंसेवक, सेवा दल व इतर भगिनी व महापुरुष या स्वछता मोहिमेत सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा